spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraस्वच्छतेचा नारा देणाऱ्या शहरात घाणीच साम्राज्य, कुजलेल्या कचऱ्यातून पसरली दुर्गंधी

स्वच्छतेचा नारा देणाऱ्या शहरात घाणीच साम्राज्य, कुजलेल्या कचऱ्यातून पसरली दुर्गंधी

उरलेले अन्न फेकतात रस्त्याचा शेजारी

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी : स्वच्छतेचा नारा देत शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून उपाय योजना आखल्या जातात. यासाठी मोठा निधीही खर्च होता. परंतु, शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली तर स्वच्छता नक्की होते कुठं, असा प्रश्न पडतो. शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. अनेक नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे.

या भागात कचऱ्याचा विळखा

स्वच्छ भारत स्वच्छ शहर म्हणत गडचिरोली जिल्ह्यातील खुरपुंडी रोड किमान 80 गावांना जोडणारा हा रस्ता आहे नगरपरिषदेने स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात करुण मोठ मोठाले बॅनरबाजी करुन . स्वच्छता मोहिमेचा मोठा गाजावाजा केला. मात्र, शहराची आजची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक परिसरामध्ये कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळत आहेत. शहरातील मुख्य मार्गावरून काही अंतरावर असलेला खुरपुंडी मार्गावर बस स्थानक, जुने बस स्थानक, बाजार रोड, यासह सिंदफणा नदीवरील असणाऱ्या पुलाच्या परिसरामध्ये कचऱ्याचा ढीग उरलेले अन्न दुर्गंधी याच गोष्टीचा विळखा आहे. मह्त्वाचे म्हणजे याच परिसरात नगर परिषदचे घण कचरा केंद्र आहे तरी सुद्द्धा त्याच परिसरात रस्त्यावर हीच स्थिती बचावला मिळत आहे. याच मार्गावर काही दिवसापूर्वी अजगर साप निघाले होते या मार्गाने पथदीवे नसल्याने नेहमिच अंधार रहातो हींस प्राणी सुद्धा निघत असतात त्या करीता नगर परिषद ने या मार्गावर पथदिव्यांची सोय करुन द्यावे अशी जनतेची मागणी आहे तसेच

हॉटेलमधील शिळे, प्लॅस्टिक कचरा, यासह अन्य घातक कचरा देखील या मार्गावर पाहायला मिळतो. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. येथील कचरा लवकरात लवकरात लवकर साफ करावा अशी मागणी नागरिक करत आहे.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शासन प्रशासनाकडून आव्हान देखील करण्यात येत आहे. शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. परंतु, शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्या देखील तुंबल्या असून त्यावर कचऱ्यांचे तरंगते थर दिसून येत आहेत. यामुळे परिसरातील बाहेरगावच्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय.

घाणीचा त्रास

लाखो रुपये खर्चून नगर परिषदेने घंटागाडीची सुरुवात केली. स्वच्छते मोहिमेसाठी अनेक कर्मचारी देखील नगर परिषदेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. कचरा उचलण्यासाठी वेगवेगळे वाहन देखील उपलब्ध आहेत. मात्र, शहरातील मुख्य परिसरामध्ये कचऱ्याने विळखा घातल्यामुळे नागरिकांना आता या कचऱ्याच्या विळख्यामधून रस्ता काढत वाट शोधावी लागत आहे.बेजबाबदार नागरिकांमुळे घाण पसरलेली आहे

आम्ही स्वच्छतेसाठी कटाक्षाने उपाय करीत आहोत आम्ही त्या मार्गावर सी. सी. टी. वी कॅमेरा लावणार त्या मार्गावर पथदिव्यांची सोय करणार तसेच उरलेले अन्न उघड्यावर फेकंणार्यवर कायदेशीर कारवाई करू

सुर्यकांत पिदुरकर गडचिरोली नगर परिषद मुख्याधिकारी

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे