spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraगणेशोत्सव निमित्ताने पर्यावरण पूरक संदेश देऊन वृक्षारोपण

गणेशोत्सव निमित्ताने पर्यावरण पूरक संदेश देऊन वृक्षारोपण

चंद्रपूर भारत स्काऊट गाईडच्या वतीने नवभारत विद्यालय मूल येथे स्काऊट व गाईडच्या विद्यार्थीनीं…. शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.एच.झाडे सरांच्या परवानगीने तसेच गाईड शिक्षिका सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला…
सर्वप्रथम झाडे लावा झाडे जगवा असे नारे देत व चार्ट द्वारे सेव्ह ट्री सेव्ह लाईफ हा संदेश देत वृक्षदिंडी काढण्यात आली..त्यानंतर थंडगार छाया देणारे कडूलिंबाचे रोपन करून त्याला सुरक्षाकवच लावण्यात आले… गांधी चौक येथील गणेश मंडळाजवळ चार्ट द्वारे पर्यावरण पूरक संदेश दिला… गणेशोत्सवात नदी व तलाव स्वच्छ ठेवा आरोग्य मय जीवन जगा वाॅटर टॅन्क मध्ये श्री गणेशाचे विसर्जन करा असे सांगून पर्यावरण पूरक संदेश दिला…


अशा प्रकारे सुंदर व आनंददायी वातावरणात हा उपक्रम स्काऊट व गाईडच्या विद्यार्थीनीं राबवून समाजात नवं चैतन्य निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केला…


सदर उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री एस.एच.झाडे सर,जेष्ठ शिक्षक श्री.डांगरे सर,कला शिक्षक श्री सलाम सर, श्री .बोडे सर ,स्काऊट शिक्षक श्री.सुनिल चौधरी सर.. संपूर्ण उपक्रमाची आयोजिका, शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ.व्हि.एस. भांडारकर मॅडम व तसेच सहयोगी सर्व शिक्षक शिक्षिका स्काऊट व गाईडचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते…🌱🌱🌱💧💧💧

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे