मूल:—
मूल नगरपालिकेचे कार्यशील मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे
अचानकच बदलिचे आदेश धडकल्याने
व पाटणकर हे ६ तारखेला नविन ठिकाणी रुजू झाल्याने आच्छयंवजा
नाराजीचा सूर मूल शहरात उमटत आहे.अभ्यासू , प्रामाणिक,पारदर्शक
प्रशासन देण्यात पाटणकर यशस्वी
झाले होते हे विशेष.
पाटणकर हे वर्षभराआधीच् बदलीवर गेल्याने मूल शहरातील विकासकामांत खिळ बसते की काय अशी भिती नागरिकांमध्ये दिसून येत
आहे. गत सालात अनेक नागरी समस्या सोडविण्यात पाटणकर यांनी
पुढाकार घेऊन जनमताची कदर केली
होती.
अजय पाटणकर यांची सातारा जिल्ह्यातील रहमतपूर नगरपरिषदेमध्ये
मुख्याधिकारी म्हणून बदली झाली असून दि.५ सप्ते. ला बदलीचे आदेश
येऊन धडकले व ६ सप्ते. लाच पाटणकर राहमतपुत येथे रुजू झालेले
आहेत.
गत् पावसाळ्यात मूल शहरातील ८००
घरांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते. अजय पाटणकर यांनी मूल येथे येताच लगेच संबधित विभागांसोबत नियोजन करून या गंभीर समस्येपासून मूल शहराला मुक्त
केले हे विशेष.श रातील पाणी निचरा,कर वसूली,रस्ते बांधकाम अशा अनेक कामातून पाटणकर यांनी कामाची चूणूक दाखविली होती.
मूल नगरपरिषदेत सध्या प़शाशक
आहे,या स्थितीत नविन मुख्याधिकारीपदी कुणाची वर्णी लागते
याकडे नगर वासियाचे लक्ष लागले आहे.




