spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraनवभारत विद्यालय मूल येथे शिक्षकदिन अतिउत्साहात साजरा

नवभारत विद्यालय मूल येथे शिक्षकदिन अतिउत्साहात साजरा

शिक्षक,शिक्षणतज्ञ,थोर विचारवंत,तत्वज्ञ,लेखक, विद्वान तसेच आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा पाच सप्टेंबरआज जन्मदिवस…हा जन्मदिवस सर्व भारतभर शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.. शाळेतील उत्कृष्ट कलाशिक्षक श्री सलाम सरांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं सुंदर चित्र काढले..नवभारत विद्यालय मूल येथे सर्व विद्यार्थी व त्यांच्या मंत्रीमंडळाने शिक्षक दिन साजरा केला…

सर्व प्रथम पहिल्या पाच पिरेडमध्ये स्वयंमशासन घेण्यात आले.. अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थांनी शिक्षकांची भूमिका बजावली…
दुपारनंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.एच.झाडे सरांच्या अध्यक्षतेखालील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित भाषण स्पर्धा व गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.सर्वप्रथम डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे करुन प्रतिमेचं पूजन अभिवादन करण्यात आले …

स्वागतगीताने सारे विद्यालय दुमदुमले..
यानंतर सर्व शिक्षकांना विद्यार्थांनी सन्मानीत करुन बेस्ट टीचर पारीतोषिक दिला सर्व शिक्षकांसाठी ही फार मोठी अभिमानाची व आनंददायी गोष्ट आहे… अतिशय कौतुकास्पद अशी गोष्ट विद्यार्थांनी घडवून आणली… सर्वांच्या भाषणातून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उत्कृष्ट कार्याचे जीवनपट विद्यार्थ्यांसमोर आले…अशा थोर पुरुषाला शतशः नमन..🙏🙏
तसेच शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कु.नंदिनी वालदे तर आभार प्रदर्शन कु.कामेश्वरी गुंडेवार या विद्यार्थिनीने केले..अतिउत्साहात संपूर्ण कार्यक्रम पार पडला…
सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते..

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे