तालुका प्रतिनिधी,
मूल: सार्वजनिक ठिकाणी आताशा मोठी समस्या मूल शहरात जर कुठली असेल तर ती लघुशंकेची.

मूल शहर “ग्रीन सिटी” कडे वाटचाल करित असल्याची बतावणी होत असताना मात्र शहरात पुरुष व महिला या दोघांनाही शहरातील वर्दळीच्या ठिकाणी लघुशंका हा “रेड प्रॉब्लेम”ठरला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

नागपूर सारख्या महानगरात म.न.पा. ने लघुशंकेची समस्या प्राधान्याने
सोडविणयाचा प्रयत्न केला आहे. मात्र मूल शहरात मात्र विकासकामांची धुम असली तरी अत्यंत निकडीची सार्वजनिक लघुशंकेची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. लघुशंकेची जाणीव झाल्यास खरेदी अर्धवट सोडून घरचा रस्ता धरल्याशिवाय पर्याय नाही हे निश्चीत.

शहरात गांधी चौकाच्या चारही बाजूने मुख्य बाजार आहे.गांधी चौक ते न.प. पर्यंत वर्दळीचा कळस असतो. मूल शहरातीलच नाही तर गावखेड्यातील आगंतुकांची मोठी गर्दी होत असते.
तासनतास खरेदी करताना लघुशंका आली तर मात्रं काही खरे नाही.एकतर कुणाच्या घरी आसरा अथवा कुठेतरी आडोशाने खाली व्हावे लागते.भगिनींना तर ही मोठा त्रासदायक बाब.नाही म्हणायला न.प.
क्षेत्रात कित्येक सालाआधी बांधलेले सार्वजनिक मुत्रिघर आहेत.मात्र ते आता कचराघर झालेले दिसतात.

गांधी चौकातील मुतारीवर अतिक्रमण धारकांनी आपला झेंडा रोवून जागा सर केली आहे. चुकून शहरात एखाद दुसरी मुतारी असेल तर तिची सफाई करण्याची तसदी घेण्याची गरज न.प.ला दिसत नाही. लघुशंका हा विषय गमतीने घेण्याजोगा नाही. तसेच गुजरी मधे येणाऱ्या लोकांना मुतारी नसल्याने नेमके बाजारातील बॅँकेच्या मागील परीसरात उघड्यावर लघुशंका करीता जातात याचा शेजाऱ्यांना खूप त्रास होतो
तसेच हा .जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे.अनेक रुग्ण उपचारासाठी
शहरात येतात.यात मधुमेहींची संख्या मोठी असते.यांना मोठी गरज असते
लघुशंकेसाठी योग्य मुतारींची. मात्र नेमका हाच मूलभूत प्रश्न मूल शहरात
अधिक क्लिस्ट झालेला दिसतो.
“ग्रीन सिटी” म्हणविल्या जाणाऱ्या मूल शहरात लघुशंका हा “रेड प्रॉब्लेम”
झाला असल्याची नगरवासीयांची ओरड कायम आहे.




