विविध भागातील शेकडो कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्ष प्रवेश
चामोर्शी:- भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षात चामोर्शी तालुक्यातील घोट येथील विकास तांदूळ गिरणी चे संचालक तथा विदर्भ आंदोलन समितीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष , अशोक पोरेडीवार यांचा १५ जून रोजी नागपूर नगरीत कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी केसीआर यांचे हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन पक्ष प्रवेश देण्यात आला
१५ जून रोजी नागपूर नगरीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला

पक्षाचे सर्वेसर्वा व तेलंगणा राज्याचे मा. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पार पडला. त्यावेळी विविध भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.
प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या व्यक्तींना मंचावर बोलावन केसीआर यांच्या हस्ते पक्षाचा
बोलावून केसीआर यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन पक्ष प्रवेश देण्यात आला.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या संबोधनातून विविध मुद्दयांना स्पर्श करत सामन्याच्या, शेतकऱ्याच्या वंचितांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व कृती होणार आहे असे प्रतिपादन केले.
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर राज्यातील पहिले स्वमालकीचे कार्यालय नागपुरात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून विदर्भ विभागीय पक्ष विस्ताराचे काम केले जाणार आहे. या विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या शुभहस्ते गुलाबी फीत कापून करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भारत राष्ट्र पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण केले.
त्यानंतर पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांना त्यांनी पदग्रहण व खुर्चीवर आसनस्थ केले. यावेळी भारत राष्ट्र समितीचे प्रवक्ता के . के … माजी..यावेळी भारत राष्ट्र समितीचे प्रवक्ता के.के., माजी खासदार बी. बी. पाटील, आमदार बलका सुमन, माजी आमदार राजू तोडसाम, राज्यसभेचे माजी खासदार संतोष राव, माजी आमदार चरण वाघमारे, पूर्वविदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर, मा.खा.हरीभाऊ राठोड, माणिक कदम, मा. आ. दीपक आत्राम, मा. आ. राजूजी तोडसाम ,मा.आ. वसंतरावजी बोंडे, पवन तिजारे, मुरलीधर भरै, निखिल देशमुख, मा. आ. नागेश्वर घोडाम,प्रविण शिंदे,आ.जग्गुरामन्ना, आ.कोनेरु कोणप्पा,मा.आ.विठ्ठलराव दंडे, आ.बालका सुमन, आ. जीवन रेड्डी, श्रवणकुमार रेड्डी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शंकर अण्णा धोंडगे, संजय बोरकर, मणिष नांदे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होते
बीआरएस पक्षत प्रेवेशा बाबत अशोक पोरेडीवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मी गेल्या अनेक वर्षापासून अनेक पक्षात राहून सामाजिक चळवळीत सहभागी होतो मात्र त्या त्या पक्षात माझा वापर केला परंतु सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर त्यासाठी या पक्षात प्रवेश करत पक्षाच्या माध्यमातून सामाजिक चळवळ राबविण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले.




