spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtra'देवेंद्र फडणवीस मला घटस्फोट देतील', अमृता फडणवीसांनी अनिल जयसिंघानीला असं कां सांगितलं?...

‘देवेंद्र फडणवीस मला घटस्फोट देतील’, अमृता फडणवीसांनी अनिल जयसिंघानीला असं कां सांगितलं? पोलिसांचा मोठा खुलासा

[ad_1]

Amruta Fadnavis Threat Case: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याकडून लाच आणि खंडणी मागत धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 793 पानांची चार्जशीट (Chargesheet) दाखल केली आहे. मलबार हिल पोलीस ठाण्यात ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून यामधून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 56 वर्षीय अनिल जयसिंघानी आणि त्याची 24 वर्षीय मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चार्जशीटमध्ये बुकी अनिल जयसिंघानीवरील (Anil Jaisinghani) आरोप मागे घेण्यासाठी अमृता फडणवीसांना अनीक्षा जयसिंघानीने (Aniksha Jaisinghani) 1 कोटींची ऑफर दिली होती अशी माहिती चार्जशीटमध्ये देण्यात आली आहे. 

पोलिसांच्या सल्ल्यानुसारच अमृता फडणवीसांचं संभाषण

अनिल जयसिंघानी 8 वर्षांपासून फरार होता. तो वारंवार वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांन चकवा देत होता. यामुळे त्याचा शोध घेणं पोलिसांना कठीण जात होतं. यादरम्यान, अनिल जयसिंघानी 15 प्रकरणात फरार होता आणि या  प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

मलबार हिल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारीला एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर अनिल जयसिंघानी याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी अमृता फडणवीस यांना त्याच्या संपर्कात राहण्यास सांगितलं. याचवेळी अमृता फडणवीस यांनी अनिल जयसिंघानी याला त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्यांमध्ये मदत करण्याची ऑफर दिली. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले संबंध ताणले असल्याबद्दलही सांगितलं.

22 फेब्रुवारीला अमृता फडणवीस यांनी अनिल जयसिंघानीला सांगितलं की, “जर तुमच्याविरोधात चुकीच्या पद्दतीने गुन्हे दाखल करत अडकवण्यात आलं असेल तर मी देवेंद्रजींशी बोलून तुम्हाला न्याय देण्यास सांगेन. पण मी गैरमार्गाने पैसे कमावण्याच्या अनिक्षाच्या मागण्या पूर्ण करु शकत नाही. मी काहीच चुकीचं केलेलं नाही. पण तुम्ही आणि अनिक्षा पहिल्या दिवसापासून मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने प्रयत्न करत आहात”.

“हे व्हिडीओ मला काही कार बदनाम करतील पण जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा त्याचा काही परिणाम होणार नाही. जर हे तुम्ही न्याय मिळावा यासाठी करत असाल तर मी काय करावं असं अपेक्षित आहे ते सांगा,” असं अमृता फडणवीस यांनी अनिल जयसिंघानीला सांगितलं होतं. यानंतर त्यांनी अनिल जयसिंघानीला  काही कागदपत्रं पाठवण्यास सांगितलं होतं. अनिल जयसिंघानीने काही ऑडिओ मेसेज त्यांना पाठवले होते. 

24 फेब्रुवारीला अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा अनिल जयसिंघानीशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी त्याच्याशी देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले संबंध ताणले गेल्यासंबंधी सांगितलं. पोलिसांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी हे संभाषण केलं होतं. 

यावेळी त्यांनी अनिल जयसिंघानीला सांगितलं की “फोनवर बोलण्यापेक्षा मी अनिशाला सागर बंगल्याऐवजी इतर ठिकाणी भेटेन. मी हे प्रकरण समजून घेईन आणि नंतर देवेंद्रजींशी बोलेन. देवेंद्र फडणवीस पुणे पोटनिवडणुकीत व्यग्र असल्याने मी 26 तारखेनंतरच भेटू शकते”.

“देवेंद्र फडणवीस मला घटस्फोट देतील”

“असंही 2019 पासून आमचे संबंध फार काही चांगले राहिलेले नाहीत. मला वाटतं या प्रकरणानंतर ते मला घटस्फोट देतील. पण एक गोष्ट मला माहिती आहे की, कागदपत्रं पाहिल्यानतंर जर तुमच्यावर अन्याय होत आहे असं त्यांना दिसलं तर ते 100 टक्के न्याय देतील,” असंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं होतं.

मुंबई पोलिसांनी लाचखोरी आणि खंडणीच्या प्रयत्न प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, अनिल जयसिंघानी यांच्या मुलीने एकदा अमृता फडणवीस यांना आपण बुकींची माहिती पोलिसांना देऊन आणि त्यांना अटक करून खूप पैसे कमावू शकतो असं सांगितलं होतं. 

चार्जशीटमध्ये अमृता फडणवीस आणि जयसिंघानी पिता-पुत्रीत झालेल्या अनेक संभाषणांची माहिती देण्यात आली आहे. 793 पानांच्या चार्जशीटमध्ये अनिल जयसिंघानी, मुलगी अनिक्षा आणि चुलत भाऊ निर्मल यांची अमृता फडणवीस यांच्याकडून लाच मागणे आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. त्यात अमृता फडणवीस आणि वडील-मुलगी यांच्यातील कथित व्हॉट्सअॅप चॅट्स आणि मेसेजचे स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत. 



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे