spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraअखेर न.प.नगर रचना सहायकाचीबदली.

अखेर न.प.नगर रचना सहायकाचीबदली.

चंद्रपुर/मुल ( तालूका प्रतिनिधी )न.प. बांधकाम विभागाअंतर्गत मोठया प्रमाणात सुरु असलेली अनियमितता व चुकीचे धोरण यामुळे न.प. चे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याने माजी बाजार समिती सभापती मोती टहलियानी यांनी याबाबत पालकमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे पाठपुरावा करून न.प. बांधकाम विभागाचे उदासिनता व चुकीचे धोरणपुढे आणले होते. शहराअंतर्गत बांधकाम मंजूरीची अनेक प्रकरणे प्रलंबीत होत होती, त्रासलेल्या अनेक बांधकाम कर्त्यांनी विना परवाना बांधकाम सुरु केल्याचे दिसत होते. यामुळे फार मोठे बांधकाम करापासून वंचीत होवून न.प. ला मोठा आर्थिक फटका बसत होता.शहरात अशा विना परवाना बांधकाम करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या संख्येत वाढू लागल्याचे चित्र पुढे आल्याने या मागणिची दखल पालकमंत्री यांनी घेतली व अखेर नगर रचना सहायक अशोक बाबर यांची बदली करणयात आली आहे.प्रत्यक्षात नगर वासीय रहिवासी क्षेत्रात नविन बांधकाम व नुतनीकरण याकरीता मोठया प्रमाणात प्रकरण सादर करीत असतात. बांधकाम नियमानुसार होत असेल, कुणाची तक्रार नसेल, टायटल क्लिअर असेल तर त्वरीत बांधकाम मंजरी द्यायला हवी यातून न.प. चे उत्पन्न उभे होत असतांना मात्र न.प. नगर रचना सहायक यांचे हेकेखोरपणा व चुकीचे धोरणामुळे आर्थीक नुकसान होत असल्याची व पर्यायाने अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणात सुरु असल्याची ओरड सुरु होती.आता बाबर याचे बदलीमुळे नगरवासियांना मोठ दिलासा मिळाला आहे..न.प. बांधकाम अभियंता यांनी बांधकाम मंजूरी प्रकरण सादर होताच मोका चौकशी त्वरीत करावी, जागेचे कागदपत्रे त्वरीत तपासावे व न.प. नियमानुसार नकाशा तपासावा ही अपेक्षा असते मात्र हेतुपूर्वक दिरंगाई व चुकीचे धोरण राबवून न.प. चे मोठे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी मोतीलाल टहलियानी यांनी केली होती हे विशेष. क्षेत्राचे आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे ही करण्यात आली होती.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे