spot_img
Saturday, July 19, 2025
HomeMaharashtraविषबाधा प्रकरणात सखोल चौकशी करावी - आ. श्री. सुधीर मुनगंटीवार

विषबाधा प्रकरणात सखोल चौकशी करावी – आ. श्री. सुधीर मुनगंटीवार

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा द्या

चंद्रपूर – विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणातील सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावे, अशाही सूचना आ. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली. या शाळेत एकूण 126 विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर त्यातील 106 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.

या संपुर्ण प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आ. मुनगंटीवार यांनी दिले आहेत. रुग्णालयात भरती विद्यार्थांना उत्‍तम उपचार मिळावे, यासाठी जिल्‍हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष द्यावे, असे निर्देशही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे