spot_img
Thursday, January 23, 2025
HomeMaharashtraमुल तालुक्यातील धान खरेदीसाठी दोन नोंदणी केंद्र वाढवा

मुल तालुक्यातील धान खरेदीसाठी दोन नोंदणी केंद्र वाढवा

मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पणन अधिकारी यांना सूचना

चंद्रपूर, दि.०२-मुल तालुक्यातील बाजार समितीच्या धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मुदत वाढवून दिली असली तरीही गर्दीमुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. अशात बेंबाळ व चिरोली गावांमध्ये दोन ऑनलाईन नोंदणी केंद्र वाढवून देण्यात यावे, अशा सूचना मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पणन अधिकारी यांना दिल्या आहेत.

दोन ऑनलाईन नोंदणी केंद्र वाढविणे नितांत गरजचेचे असल्याची बाब मुलचे माजी पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार व भाजप नेते प्रवीण मोहुर्ले व त्यांच्या शिष्टमंडळांनी निदर्शनास आणून दिली होती. तातडीने दखल घेत मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पणन अधिकारी ऑनलाइन नोंदणी केंद्र वाढवून देण्याच्या संदर्भात सूचना केल्या आहेत.

मुल बाजार समितीला एकच नोंदणी केंद्र आहे. त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या नोंदणी केंद्रावर गर्दी करीत आहेत. अशात कुणीही धान बोनसच्या नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी, मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दोन ऑनलाईन नोंदणी केंद्रामुळे बेंबाळ व चिरोली परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मा.आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे