पोंभुर्णा : तालुक्यातील गंगापूरटोक
जवळील वैनगंगा नदीतून वाळू चोरी करून नेत असताना पोलिसांनी दोन ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी राहुल पाल, प्रदीप चंदुलवार आणि अजय चुदरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव, गंगापूरटोक गावानजीकच्या वैनगंगा नदीतून अवैधरित्या वाळूचा उपसा करुन वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे तीन नोव्हेंबर रोजी पोलिसांचे पथक तिथे गेले. तेव्हा वैनगंगा नदीतून वाळू चोरून दोन ट्रॅक्टर जात होते. पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही कारवाई पोंभुर्णा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक धनराज सेलोकर यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार हरिंद्रकुमार भारती, जगदिश पिपरे यांनी केली. दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. ट्रॅक्टर मालक राहुल पाल भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष असून चालक प्रदीप चंदुलवार, अजय चुदरी यांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे