spot_img
Saturday, July 19, 2025
HomeUncategorizedराज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, यादी जाणून घ्या

राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, यादी जाणून घ्या

भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) पोलिस उपायुक्त दर्जाच्या १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश गृह विभागाकडून बुधवारी (ता. ७) काढण्यात आले.

गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुणे शहरात पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. तर, पुण्यातील परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे.

अन्य पोलिस अधिकाऱ्यांचे नाव, सध्याचे आणि कंसात बदलीचे ठिकाण-

विनयकुमार राठोड- पोलिस उपायुक्त वाहतूक, ठाणे शहर (पोलिस अधीक्षक ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर), अविनाश बारगळ- पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती (पोलिस अधीक्षक बीड), अविनाश कुमार- अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नांदेड (पोलिस अधीक्षक नांदेड), दिगंबर प्रधान- पोलिस अधीक्षक, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पोलिस उपायुक्त मुंबई), मोहन दहीकर- पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे (पोलिस उपायुक्त ठाणे शहर), प्रकाश जाधव- पोलिस उपायुक्त, मुंबई (सहाय्यक पोलिस महानिरीक्षक, मुंबई),
गोरख भामरे- पोलिस उपायुक्त नागपूर (पोलिस अधीक्षक गोंदिया), जी. श्रीधर- पोलिस अधीक्षक, हिंगोली (पोलिस उपायुक्त पुणे), प्रियांका नारनवरे- समादेशक राज्य राखीव पोलिस बल, नागपूर (पोलिस अधीक्षक लोहमार्ग नागपूर). तसेच, भारतीय पोलिस सेवेतील मनीष कलवानिया, श्रीकृष्ण कोकाटे आणि नंदकुमार ठाकूर यांची बदली करण्यात येत असून, त्यांच्या पद स्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे