spot_img
Friday, June 13, 2025
HomeMaharashtraभीषण अपघात! सुसाट कार रेलिंगला धडकून ४- ५ वेळा उलटली, दोघांचा मृत्यू;...

भीषण अपघात! सुसाट कार रेलिंगला धडकून ४- ५ वेळा उलटली, दोघांचा मृत्यू; ३ जखमी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. मुंबईच्या वरळीमधील अपघात तसेच पुण्याच्या खडकीमधील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच नागपूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.

भरधाव कार उलटून हा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातील नागपूर कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार पलटी झाल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. तीव्र गतीने येणारी एक स्विफ्ट कार रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रेलिंगला धडकली आणि त्यानंतर अनियंत्रित होऊन कार पलटी घेऊन अनेक मीटर लांब जाऊन थांबली.या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी आहेत.

याबाबतची माहिती मिळताच स्थानिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना नागपूरच्या दोन वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक:-
विक्रम मधुकर गादे राहणार महादुला वय वर्ष 20
आदित्य प्रमोद पुण्यपवार वय वर्ष 22 राहणार गडचिरोली

जखमी:-
सर्जन मानवटकर वय वर्ष 22
सर्जन चव्हाण वय वर्ष 22
जय संजय भोंगाडे राहणार कोराडी वय 22

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे