spot_img
Saturday, July 19, 2025
HomeMaharashtraपोलिस कोठडी आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी

पोलिस कोठडी आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी

वरोरा (चंद्रपूर): अत्याचार व हत्याप्रकरणात पोलिस कोठडीत असलेला आरोपी समाधान लुक्का कोळी (२५) याने गळफास घेऊन पोलिस कोठडीत आत्महत्या केलेल्या प्रकरणाचा तपास सीआयडीची चमू करत आहे. घटनेच्या दिवशी सीआयडी चमूने वरोरा गाठून घटनेचा पंचनामा

केला. काही दस्तऐवजही जप्त करण्यात आले असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी नितीन तुरारे, धनंजय वरगंटीवार महिला पोलिस कर्मचारी मनीषा
कुतरमारे या तिघांना सोमवारीच निलंबित केले होते. समाधान कोळी या युवकाने आनंदवनात राहणाऱ्या आरती चंद्रभान चंद्रवंशी (२४) हिच्यावर
अत्याचार करून हत्या केली होती. या प्रकरणी समाधान कोळी वरोरा पोलिस स्टेशनच्या पोलिस कोठडीत होता. दरम्यान रविवारी सकाळी ८:३०च्या सुमारास बुटाची लेस घेऊन पोलिस कोठडीमधील स्वच्छतागृहात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपीची देखरेख करण्याकरिता नितीन तुरारे या पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली

होती. आरोपी पोलिस कोठडी आत्महत्या करीत असताना नियुक्त पोलिस कर्मचारी त्या कालावधीत उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने निलंबित करण्यात आले, तर घटनेदरम्यान पोलिस स्टेशन डायरीवर कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी धनंजय वरगंटीवार व महिला पोलिस कर्मचारी मनीषा कुतरमारे यांना कामात हयगय केल्याप्रकरणी

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीआयडीने हातात घेतली असून काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृतक समाधान कोळी हा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होता. रविवारी संध्याकाळी त्याचे कुटुंबीय वरोरा येथे दाखल झाले. त्यामुळे सोमवारी चंद्रपूर येथील

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे