HomeBreking newsमूल–गडचिरोली महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच!

मूल–गडचिरोली महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच!

आकापूर वळणावर ट्रक पलटी; आतापर्यंत अंदाजे ७० ते ८० अपघात होऊनही महामार्ग विभागाचे दुर्लक्ष?

 

मूल–गडचिरोली महामार्गावरील आकापूर गावाजवळील धोकादायक वळणावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. या वळणावर पुन्हा एकदा ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागरिकांच्या दाव्यानुसार, या वळणावर आतापर्यंत तब्बल ७० ते ८० वाहनांचे अपघात झाले आहेत. तरीही या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येत नसल्याने महामार्ग विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular