spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraनळाला पाणी नाही पण मीटर लावण्याची धावपळ?

नळाला पाणी नाही पण मीटर लावण्याची धावपळ?

मुल: — मूल न.प.चे नवनविन फंडे सुरू असतात. काही दिवसांपूर्वी मुल शहारात २८ कोटी खर्चून न.प.ने शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना राबविली.या योजनेची मोठी बोंब झाली.तक़ारी झाल्यात,जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. २४ तास, सात दिवस पाणी पुरवठा करण्याचा मानस या योजनेचा होता.मात्र धग तासभरही पाणी शहर वासियांना मिळत नसल्याची बोंब सुरु असतानाच आता न.प.ने पाणी मिटर लावण्याची घाई सुरू केल्याने पाणी कुठतरी मुरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. सदर २८ कोटीची पाणी पुरवठा करणारे कॉन्ट्रॅक्टर हे सुद्धा नागपुरचे होते तसेही मुल शहारात गतिरोधक जरी लावायचे असले तर ते सुध्दा लावणारे बाहेरचे ठेकेदार बाहेरचे असतात. आता तर चक्क घरोघरी सर्वे करणारे येत असून घरी नळाला मीटर लावण्यासाठी. युद्ध स्तरावर काम सुरु करण्यात आले आहे. नळाला पाणी येणार नाही पण मीटर लागतील हा विषय हास्यास्पद ठरत आहे. हा प्रकार लग्ना आधीचं बाशिंग बांधण्याचा आहे काम? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे मुल शहरात कचरा उचलणारी कंपनी सुद्द्धा नागपूरचीच आहे. मुल शहरात सद्या असे प्रकरण वारंवार बघावयास मिळत आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे