4 हजार रुपयाची लाच घेतांना अटक
तलाठी कार्यालय साजा, क. ४ नागाळा, ता. जि. चंद्रपूर येथील तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुडुंलवार यांचे विरूध्द अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर वी कारवाई
तलाठी कार्यालय साजा. क. ४ नागांच्ळा, ता. जि. चंद्रपूर येथील तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंगुरवार यांचे विरुध्द ५०००/- रूपये मागणी करून तडजोडीअंती ४०००/- रू. स्विकारल्या संबंधाने अॅन्टी करफान ब्यूरो चंद्रपूर यांचे पथकाने आज रोजी कार्यवाही केली.
याबाबत सविसार वृत्त असे की, यातील तक्रारदार हे मौजा सिदुर, पी. पिपरी (धानोरा), ता. जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन शेतकरी आहेत. तक्रारदार यांचे वडीलांनी त्यांचे नावे असलेली मौजा सिदुर, पो. पिपरी (धानोरा), ता. जि. चंद्रपूर येथील शेतजमीन तकारदार व तक्रारदार यांच्या पत्नींचे आणि तक्रारदार यांचे मुलाचे नावे बक्षिसपत्र करुन दिले होते. सदर बक्षिसपत्र करून दिलेली शेतीचे फेरफार करण्याचे कामाकरीता तकारदार हे मौजा नागाळा येथील तलाठी कार्यालय येथे जाऊन तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुङ्करवार यांचेकडे अर्ज केला होता. तकारदार हे काही दिवसानंतर सदर अर्जाची चौकशी करण्याकरीता तलाठी कार्यालय नागाळा येथे गेले असता तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंगुरवार यांनी फेरफार करून सातबारा उतारे तयार करून देण्याचे कामाकरीता ५०००/- रूपयाची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडुरबार यांस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.
प्राप्त तकारीवरून आज दिनांक ०७/०३/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील यांनी तकारदाराने दिलेल्या तकारीची गोपनीयरित्या शहानिशा करून पडताळणी/सापळा कारवाईचे आयोजन केले, त्यामध्ये पडताळणी कार्यवाहीदरम्यान तलाठी श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडुरवार यांनी शेतीचे फेरफार करून सातबारा उतारे तयार करून देण्याचे कामाकरीता तडजोडीअंती ४०००/-रू लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून तलाठी कार्यालय साजा क. ४ नागाळा, ता. जि. चंद्रपूर येथे पंचासमक्ष कार्यवाहीदरम्यान महिला आ.लो.से. श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडुरवार, तलाठी, तलाठी कार्यालय नागाळा यांना ४०००/- रूपये लाब रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.
सदरची कार्यवाहीश्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोहवा, हिवराज नेवारे, नापोशि रोशन चांदकर, पो.अ. वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, म.पो.अ. पुष्पा काचोळे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चा.पो.अ. रामेश्वर पाल मो.प. वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे. हॅश वॉल्यु घेण्यात आलेली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फो व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय नागपूर दुरध्वनी क्रमांक
श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर
श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर
०७१२-२५६१५२०
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक
टोल फ्रि क्रमांक
०७१७२-२५०२५१
श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर
१०६४
श्री. प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर
९३२२२५३३७२
श्री. जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर




