spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraस्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी एका सराईत गुन्हेगारांकडुन पो.स्टे. सावली, येथील कार...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी एका सराईत गुन्हेगारांकडुन पो.स्टे. सावली, येथील कार चोरीचा गुन्हा उघड

चंद्रपुर जिल्हयात चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी असल्याने अभिलेखावरील अउघड गुन्हे तात्काळ उघडकिस आणणेबाबत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, . अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शना खाली शाखेचे पथकांना आदेशीत केले होते.

पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे निर्देश दिले होते. दिनांक 24/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा. येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी पेट्रोलींग करीत असतांना एक इसम सामान्य रूग्णालय, चंद्रपूर परीसरात मोपेड गाडीने फिरून चारचाकी वाहन विकी करण्याचे उददेशाने फिरत आहे. व ग्राहक शोधत आहे अशा माहिती वरूण संशयीत मोपेड चालकास सामान्य रुग्णालय, चंद्रपूरच्या समोरूण ताब्यात घेतले व त्यास विचारपुस केली असता त्यांनी व त्याचे मित्रांनी पो. स्टे. सावली हददीत कार चोरी केल्याची कबुली दिली. व सदर कार ही सामान्य रुग्णालय परीसरात लपवून ठेवली आहे. अशा कबुली वरून वैभव राजेश डोंगरे वय 25 वर्षे रा. मोखाडा ता. सावली जि चंद्रपूर ह. मु. इंदिरानगर चंद्रपूर त्यांचेकडुन त्यांनी लपवून ठेवलेली टाटा अल्ट्राज कार क. MH-34-BV-1302 ची कि. 3,00,000/- रू. तसेच त्यांनी गुन्हयांत वापरेली मोपेड गाडी क. MH-14- EX-6646 कि. 60,000/- रू. असा एकुण 3,60,000/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदर कर्यवाही . पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, . अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनी, बोबडे, गायकवाड, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, पोशि. मिलींद जांभुळे, यांनी केली आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे