तक्रारदार हे मौजा उमरी पोतदार ता. पोंभुर्णा जि. चंद्रपुर येथील रहीवासी असून तक्रारदार यानी ग्रामपंचायत उमरी पोतदार येथे १५ व्या वित्त आयोगामधुन सन २०२२ २०२२ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपुर अंतर्गत योगा शेड बांधकामाचे काम अंदाजे कि. ३,४९,३२१/- से काम केलेले होते सदर योगा रोड बांधकामाकरिता लागलेल्या मटेरिअल व साहित्याचे पुरवठा च २,४४,५२५/- चे बिल ग्रामसेवक देवानंद गेडाम यांनी काढून दिल्यानंतर तक्रारदार यांनी उर्वरित मजुराची रक्कम काढुन देण्याकरिता ग्रामसेवक देवानंद गेडाम यांना भेटले त्यांनी योगा रोड बांधकामावर अंदाजे कि ३,४९,३२१ /- रू. या कामांवर पाच टक्के प्रमाणे १७,५००/- रू. चौ लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी देवानंद मुलीधर गेडाम, ग्रामसेवक, उमरी पोतदार यांना लान देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्यांचेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून आज दिनांक ०६/१०/२०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी देवानंद मुलीधर गेडाम, ग्रामसेवक, उमरी पोतदार यानी झालेल्या कामाचे पाच टक्के प्रमाणे १७,५००/- रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती १३,०००/- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून ग्रामपंचायत कार्यालय उमरी पोतदार येथे पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोगी देवानंद मुलीधर गेडाम, ग्रामसेवक, उमरी पोतदार यांना १३,०००/- रु. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे..
सदरची कार्यवाही ही राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र. वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्रीमती मंजुषा भोसले ला.प्र.वि. चंद्रपूर याचे मार्गदर्शनात जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, तसेच कार्यालयीन स्टॉफ ना.पो.अ. संदेश वाघमारे, पो.अ राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
चंद्रपुर जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, त्यांच्याकडे कोणत्याही शासकिय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी ईसम (एजंट) कोणतेही शासकिय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमवेशी संपर्क साधावा.
श्री राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर,
श्री. संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर
पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, कार्यालय नागपुर
फोन क्र. ०७१२-२५६१५२०
अॅन्टी करप्शन ब्युरो, कार्यालय चंद्रपुर
फोनक. ०७१७२-२५०२५१
टोल फ्री नंबर- १०६४
श्री. मंजुषा भोसले, पोलीस उप अधीक्षक ९३२२२५३३७२ श्री प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक- ९१३०५५६१६१
श्री. जितेंद्र गुरनले, पोलीस निरीक्षक ८८८८८५७१८४
Website www.acbmaharashtragov in




