spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraशहराची वाहतुक व्यवस्था यंत्रणेनेकिती मध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांना विकली ?.

शहराची वाहतुक व्यवस्था यंत्रणेनेकिती मध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांना विकली ?.

भाग….३

मूल शहरातून वाहतुक नियमांची ऐशीतैशी करुन,मुजोरी करून,वाहतुकीची कोंडी करून,भविष्यात अपघाताची मोठी मिती निर्माण करून धावणाऱ्या ट्रॅव्हल्स् नेत्यांची चाटुगिरी करणाऱ्या धनदांडग्याच्याच आहेत.या ट्रॅव्हल्स वाल्यांना वाहतुक सुरक्षिततेशी काही देणे घेणे नसले तरी मात्र नियम व कायदे सांभाळणाऱ्या वाहतुक पोलीस,आर.टी.ओ यांनी आपल्या कतंव्याशी बेईमानी करून बेकायदेशीर अवैद्य वाहतुकीस पाठबळ देवून,जनतेची सुरक्षा,शहराची उपयुक्तता या बाबतची नितीमत्ता गहाण का ठेवावी? यावर आता मूल शहरातील च नव्हे तर संपुर्ण जिल्हयातील सामान्य जनताbविवंचनेत असल्याचे चित्र आहे.

मूल शहरातील व शहरातून दररोज ५० वर ट्रॅव्हल्स बेकायदेशीरपणे,शहरातील वाहतुकीचे नियम तोडून गडचिरोली,चंदपूर, नागपूर,ब्रह्मपुरी फेऱ्या मारतात.यातील किती ट्रॅव्हल्स
परमिट काढतात? एकही नाही. असे केल्यास दिवसाचे ३५० रुपये भरावे
लागतात.या गाडयांमध्ये पासिंग किती आसनाची व बसवितात किती? हे जगजाहीर आहे. प़वाशी वाहतुक म्हणजे पवाशांच्या सुरक्षिततेची सर्वोच्च हमी असते.इथे तर बहुतेक गाडया रिमोल्ड टायरवर चालत आहेत.
या गाडयांची पासिंग होते कशी? हा अतिशय गंभीर सवाल उपस्थीत होतो.

किती ट्रॅव्हल्स मध्ये अग्निशामक यंत्रणा आहे? साधी प़थमोपचार पेटी
तरी असते का? प़वासादरम्यान दारे सताड उघडी असतात. हे मात्र पोलिस यंत्रणा व आर.टी.ओ.ला का दिसत नाही? हे दोन्ही विभाग मांडवली
ट्रॅव्हल्स वाल्यांची करतात काय? हा जनतेचा सवाल कायम आहे.

पोलीस महिणयाकाठी प्रती गाडीn१००० रूपये चंदा म्हणजे महिण्याकाठी लाख रूपये निव्वळ बेकायदेशीर अवैद्य ट्रॅव्हल्स वाहतुकीला सरक्षण देण्याकरीता घेत असल्याची ओरड जनतेमध्ये आहे.सावली,सिंदेवाही पोलीसांचा दर प्रती ट्रॅव्हल्स ६०० रुपये असल्याचे बोलले जाते. आर.टी.ओ.चा चंदा वेगळाच आहे असे बोलले जाते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे