spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraनक्षल्यांच्या नोटा बदलून देणाऱ्या दोघांना अटक, २७ लाख ६२ हजार रुपये जप्त

नक्षल्यांच्या नोटा बदलून देणाऱ्या दोघांना अटक, २७ लाख ६२ हजार रुपये जप्त

गडचिरोली,( पिंटू दुधे प्रतिनिधी )ता. ५: केंद्र सरकारने २ हजाराची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माओवाद्यांनी बेकायदेशीररित्या गोळा केलेली रक्कम बदलविण्यासाठी जाणाऱ्या दोन संशयित इसमांना पोलिसांनी अहेरी येथून अटक केली • आहे. त्यांच्याकडून २७ लाख ६२ हजार रुपये जप्त करण्यात आले असून, त्यात २ हजाराच्या नोटांचाही समावेश आहे.

रोहित मंगू कोरसा (२४) रा. धोडूर, ता. एटापल्ली व बिप्लव गितीश सिकदर (२४) रा. पानावर, जि.कांकेर (छत्तीसगड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघेही आज मोटारसायकलने जात असताना अहेरी येथे पोलिसांनी नाकेबंदी करुन दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे २७ लाख ६२ हजार रुपये आढळून आले. त्यात १२ लाख १४ हजार रुपये किमतीच्या २ हजारांच्या ६०७ नोटा, १६ लाख ३६ हजार रुपये किमतीच्या ५०० च्या ३०७२ नोटा व १ हजार ४०० रुपये किमतीच्या २०० च्या ७ नोटांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान ही रक्कम नक्षल्यांनी बदलण्यासाठी दिली असल्याचे दोघांनीही सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांवर यूएपीए ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे