[ad_1]
बुलढाण्यातील सिंदेखड राजा येथे झालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या (Bus Accident) भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नागपुरवरुन ही विदर्भ ट्रॅव्हल्स ही बस समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Highway) पुण्याकडे येत होती. मात्र शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बसचा टायर फुटल्याने महामार्गाच्या पुलावरील दुभाजकाला धडकली. या धडकेनंतर बसमधील डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला. काही क्षणातच बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता अमरावती परिवहन विभागाने (Amravati RTO) या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली.
[ad_2]




