spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraलोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Nagpur Metro Train Viral Video : लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा वावर पहायला मिळतो. मात्र, मेट्रोमध्ये देखील फेरीवाले पहायला मिळाले आहेत.  लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरी विकरणाऱ्या विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यांनतर आता थेट नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्या या फेरीवाल्याला सुरक्षा रक्षकांनी तात्काळ रोखले. 

मेट्रोमध्येच चणे, फुटाणे, पॉपकॉर्न आणि बिस्कीट विक्री

मेट्रो सार्वजनिक वाहतुकीचा दर्जेदार प्रकार आहे. मेट्रोमध्ये चणे, फुटाणे, पॉपकॉर्न, बिस्कीटची विक्री होईल असे अपेक्षित नसते. मात्र, नागपुरात एका बहाद्दराने थेट मेट्रोमध्येच चणे, फुटाणे, पॉपकॉर्न आणि बिस्कीट विक्री करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मेट्रो प्रवाशानेच हा हा व्हिडिओ चित्रित करत करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुपान व्हायरल होत आहे. 

नेमका काय आहे प्रकार

नागपूर मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे शुक्रवारी नागपूर रेल्वे स्टेशनवरून पारडीच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो रूटवर रेल्वे स्टेशन जवळ एक व्यक्ती मेट्रोमध्ये बसला. मेट्रोत प्रवेशापूर्वी त्याची नियमानुसार तपासणी झाली. तेव्हा त्याच्याकडे मोठ्या संख्येने पॉपकॉर्न, चणे, फुटाणे आणि इतर वस्तू आढळून आल्या.. संबंधित गार्डने त्याला विचारणा केली असता, माझ्या घरी एक छोटे दुकान आहे. मी त्या दुकानात विक्रीसाठी हे साहित्य बाजारातून खरेदी करून घेऊन जात आहे असल्याचे त्याने सांगितले. मात्र, थोड्या वेळानंतर मेट्रोचा प्रवास सुरू झाल्यावर या व्यक्तीने मेट्रोमध्येच चणे, फुटाणे, पॉपकॉर्नची विक्री सुरू केली. मेट्रोट वस्तू विकणाऱ्या विक्रेत्याला सुरक्षारक्षकांनी तात्काळ रोखले.

दिल्ली मेट्रोत भयानक प्रकार

दिल्ली मेट्रोत तर भयानक प्रकार घडत आहेत. दिल्ली मेट्रोत जोडप्यांचे रोमान्स करतानाचे, किस करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका तरुणाचा मेट्रो ट्रेनमध्ये आश्लिल चाळे करतानाचा व्हािडिओ देखील व्हायरल झाला होता. तर काही दिवसांपूर्वी एक तरुणी दिल्ली मेट्रोत केसांना स्टेटनिंग करत होती. मेट्रो ट्रेनमधील इलेक्ट्रीक बोर्डला तिने स्टेटनिंग मशिन कनेक्ट केली होती. असे अनेक चित्र विचित्र प्रकार दिल्ली मेट्रोत घडत आहेत. इतकचं नाही तर याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. 

लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरी विकली

लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकल ट्रेनमध्येच या तरुणाने पाणीपुरीचे दुकान थाटले आहे. गर्दीतही प्रवासी पाणीपुराचा आस्वाद घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.    

 



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे