spot_img
Friday, April 24, 2026
HomeMaharashtraपुणे हादरलं! गर्भवती महिलेवर २३ वर्षाच्या मुलाकडून बलात्कार

पुणे हादरलं! गर्भवती महिलेवर २३ वर्षाच्या मुलाकडून बलात्कार

[ad_1]

Pune Crime: गर्भवती महिलेवर बलात्काराची घटना समोर आल्यानंतर विद्येचं माहेरघर समजलं जाणारं पुणे शहर हादरलं आहे. पुण्यातील भोसरी येथून हा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने पतीला जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित विवाहित महिलेने दिली आहे. घटनेची एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सखोल चौकशी करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. फेब्रुवारी ते 28 एप्रिल दरम्यान मोशी भागात ही घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पीडितेने सोमवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात २३ वर्षीय तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. अक्षय संजय कांबळे असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी गर्भवती असल्याची माहिती आरोपीला होती. असे असतानाही आरोपी तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत  तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376(2)(h)(n), 377, 506, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न 

तत्पुर्वी पुण्यातील घोरपडी येथे अल्पवयीन मुलीला अडगळीच्या खोलीत नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. ही मुलगी अवघ्या १४ वर्षांची असून तिने प्रसंगावधान दाखवून वेळीच स्वत:ची सुटका करुन घेतली. ३ आरोपींनी हे दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे