spot_img
Sunday, June 14, 2026
HomeMaharashtraवनरक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक

वनरक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक

गडचिरोली : रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाच रक्कम स्वीकारणे वनरक्षकास चांगलेच महागात पडले आहे. प्राप्त तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनरक्षकास 15 हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली आहे, धनीराम अंताराम पोरेटी (33) असे लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे.

वनरक्षक धनीराम पोरेटी यांनी नदीतील रेतीची वाहतूक करीत असलेले दोन ट्रॅक्टर एटापल्ली नाक्याजवळ पकडून कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून देण्यासाठी 30 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच रक्कन तक्रारदार यांच्या सेतू दुकानात स्वीकारताना वनरक्षक रंगेहाथ मिळून आला. याप्रकरणी एटापल्ली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
ही कारवाई पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, पोहवा नथ्थू धोटे, नापोशी राजेश पदमगिरवार, स्वप्नील बांबोळे, पोशि किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदीप उडान च चापोहवा अंगडवार यांनी केली.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे