spot_img
Saturday, April 25, 2026
HomeMaharashtraकेसलाघाट जंगल सफारी गेट ताडोबाचा पर्यटकांनी फुलले

केसलाघाट जंगल सफारी गेट ताडोबाचा पर्यटकांनी फुलले

मुल/केसलाघाट मोकळा श्वास घेण्यासाठी पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात सुट्टीचा आनंद घेण्याला पसंती दर्शविली आहे. जैविक विविधता, नैसर्गिक वारसा आणि घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला केसलाघाट गेट ला पर्यटकांनी पसंती दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ताडोबा पर्यटकांच्या गर्दीने ताडोबा फुलले आहे.

विदर्भातील पेंच, मेळघाट, बोर आणि नवेगाव-नागझिराच्या तुलनेत ताडोब्याकडे अधिक पर्यटक वळले. हमखास व्याघ्रदर्शन हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असल्याने ही गर्दी झाली. दरवर्षीच उन्हाळ्याचा दिवसांत ताडोब्यामध्ये पर्यटकांची गर्दी असते. , निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घेण्याच्या आशेने बाहेर पडलेल्या पर्यटकांनी ताडोब्याला पसंती दर्शविली.
केसलाघाट गेट वरुन वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली. विशेष म्हणजे, सर्व वयोगटातील पर्यटकांना प्रवेश दिला जात असल्याने सहकुटुंब व्याघ्रदर्शनासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली. उन्हाळ्याच्या पूर्वीच ९० टक्के बुकिंग फुल्ल झाली होती. सध्या कोअर झोनमधील बहुतांश गेट फुल्ल आहेत. www.mytadoba.org या संकेतस्थळावरून पर्यटकांना बुकिंग करता येते. राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार उपाययोजनांच्या अधीन राहून हे पर्यटन सुरू आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे