spot_img
Saturday, April 25, 2026
HomeMaharashtraघरातून निघाला, रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, ६ वर्षांच्या मुलाने जागीच प्राण सोडले

घरातून निघाला, रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, ६ वर्षांच्या मुलाने जागीच प्राण सोडले

[ad_1]

6 Years Old child Died In Accident:भरगाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या सहा वर्षीय चिमुकल्याला धडक दिल्याने लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. अर्णव रोशन भाबड असं या सहा वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik Accident News)

रोशन भाबड हे नोकरी करीत असून ओमकार नगर कॉलनी रोडवर सुप्रभा बंगलो क्रमांक ७७ येथे आपल्या कुटुंबा समवेत राहतात. काल सकाळच्या सुमारास रोशन यांचा सहा वर्षीय मुलगा अर्णव सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राहत्या घरा समोरून रस्ता ओलांडत होता. त्यावेळी बिरसा मुंडा हॉस्पिटलकडून भरघाव वेगाने येणाऱ्या रॉयल इन्फिल्ड बाईक चालकाने अर्णवला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तसेच हातापायास देखील मार बसला होता. अर्णव यास तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी अर्णव यास मयत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

पुणे सातारा महामार्गावर अपघात

पुणे – सातारा महामार्गावर (Pune Satara highway) वरवे गावाच्या हद्दीत विचित्र अपघात झालाय. चार वाहने एकमेकांना धडकल्यानं हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 2 कंटेनर आणि 2 बसचा या अपघातामध्ये समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की एक खासगी बस उलटली आहे. तर अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. तर 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर आली आहे.

मुंबईतही अपघात

वाशी-मानखुर्द दरम्यान एका कार चालकाने बसला धडक दिल्याने अपघात घडला होता. रविवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडल्याने वाशी पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, अपघातग्रस्त बसमध्ये ४० प्रवासी होते. मात्र कोणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये. 

समृद्धी महामार्गावर अपघात

मुंबई येथून बिहारमधील छाप्राकडे निघालेल्या कारला समृद्धी महामार्गावर वैजापुरजवळ जांबरगाव ते लासुरगावदरम्यान भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी येवला येथे हलवण्यात आले आहे. अख्तर रझा (वय 1 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे