◾लोनवाही प्रभाग क्र. 2 मधला प्रताप.
सिंदेवाही: लोणवाही हे गाव सिंदेवाही नगर पंचायत बनायच्या अगोदर स्वतंत्र ग्रामपंचायत होती.आत्ता हि ग्राम पंचायत सिंदेवाही नगर पंचायत सामाईक झाल्याने या गावातील अर्थातच नगरातील समस्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे.वारंवार नगरसेवकाच्या निदर्शनास समस्या आणून देऊन सुद्धा वार्ड नं. 2 प्रभाग लोणवाही चे नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत.नगरसेवक हा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेनी निवडून दिल आहे.जनतेला सेवा देण्यास टाळाटाळ होत आहे.अनेक समश्या ग्रस्त भागात फक्त तात्पुरत्या स्वरूपात जाऊन पाहणे व तोंडी आश्वासन देऊन निघून जाणे हेच त्यांनी आपले आजपर्यंतचे प्रथम कर्त्यव्य समजले आहे.याचीच प्रचिती आज येत आहे.
पावसाळा सुरु होण्या पूर्वी नाल्यातील गाळ उपसा करण्याचे नियोजन करावे लागते. मात्र पावसाळा येऊन ठेपला तरी अद्यापही कोणताच नगरपंचायतचा कर्मचारी लोणवाहीत ढूंकूनही पाहायला तयात दिसत नाही.त्यामुळे कमालीची नाराजी वार्ड क्र. 2 च्या नगरसेवकांवरती दिसून येत आहे. नगरसेवकाच्या मुखातून एकासाठी आपण काम करू शकत नाही असे डायरेक्ट बोल्या जात आहे. मात्र कोणत्याही नागरिकाच काम हे व्यतिगत नसून तो सार्वजनिक आहे. हे एका नगरसेवकाला ठाऊक असणे गरजेच आहे.दोन महिन्या पासून पूर्णतः चार घराचा रस्ता नालीतील भोंग्याच्या अभावी जाण्यायेण्यास रखडला आहे. त्या बाबतीत संबंधित लोकांनी नगरसेवक यांना माहिती दिली असता जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य करताना दिसत असल्याने त्या लोकांमध्ये पूर्णतः नाराजगी पसरलेली आहे. काही लोकांच्या तर बोलण्यातून आपला गाव ग्रामपंचायत मध्ये असता तरच बरा झाला असता असे सुद्धा उदगार निघताना दिसत आहे.त्यामुळे नगरसेवक यांच्या समस्याकडे लक्ष्य देणार कि नुसतं दिखावा म्हनुन राहणार याकडे समस्त लोणवाही वासियांचे लक्ष्य लागलेले आहे.




