spot_img
Sunday, April 26, 2026
HomeMaharashtraयेत्या 48 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होणार;राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा...

येत्या 48 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होणार;राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाजबिपरजॉय चक्रीवादळ पुढील 48 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

मुंबई, 9 जून : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट आहे, पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र असं बिपरजॉय चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 820 किलोमीटर, मुंबईपासून 840 किलोमीटर तर पोरबंदरपासून 850 किलोमीटर अतंरावर आहे. पुढील 48 तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत हे चक्रीवादळ उत्तर -ईशान्येकडे व त्यानंतर तीन दिवसानंतर ते उत्तर वायव्यच्या दिशेनं सरकरणार आहे.

राज्यात पावसाची स्थिती

दरम्यान केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जाहीर केलं. पुढील 48 तासांत मान्सून आणखी प्रगती करणार असल्याचं ‘IMD’ने आपल्या अंदाजात म्हटलं आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी सोडून इतर भागांत मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातही पुढील तीन दिवस विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहणार आहे. आज अमरावती, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच 10 जून रोजी अमरावती, वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात सोसायट्या वारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस तापमानात कोणतीही वाढ होणार नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे