spot_img
Tuesday, June 16, 2026
HomeMaharashtra८१ग्राम पंचायतीमध्ये साहित्य खरेदीत घोटाळा?

८१ग्राम पंचायतीमध्ये साहित्य खरेदीत घोटाळा?

बीडीओंची केली विभागीय आयुक्तांकडे तक्रार

चंद्रपूर : ग्रामपंचायत स्तरावरील २०२०-२१ ते २०२२-२३ अंतर्गत १५वा वित्त आयोग निधी तसेच सामान्य फंड निधीचे ग्रामपंचायत खरेदीचे अधिकार डावलून, ग्रामसेवकांना विश्वासात न घेता, निविदा प्रक्रिया न राबविता वरोरा तालुक्यातील ८१ ग्रामपंचायती, शाळा, प्रा. आ. केंद्रे, अंगणवाड्यांसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने साहित्य खरेदी करून ३२ लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप सोसायटी फॉर फास्ट जस्टीस विदर्भ या संघटने करून संबंधित संवर्ग विकास अधिकाऱ्यांची तक्रार आयुक्तांकडे केली आहे.

८१ ग्रामपंचायतींकरिता असलेल्या १५वा वित्त आयोग निधी आणि सामान्य फंडातील निधी खर्च करण्याची ‘जबाबदारी व अधिकार ग्रामपंचायतीला असतो किंवा पंचायत समितीने पुरवणी मागणी केल्यास त्याप्रमाणे तो निधी खर्च करता येतो. परंतु, संबंधीत ग्रामपंचायती, शाळा, प्रा. आ. केंद्रे / उपकेंद्रे आणि अंगणवाड्यांकडे कोणत्याही प्रकारची पूर्वमागणी न करता तसेच त्यांना विश्वासात न घेता वरोरा पंचायत समितीचे संवर्ग विकासअधिकारी संदीप गोडशेलवार यांनी त स्वतःच्याच मर्जीने अधिकच्या दराने हॅन्डवॉश सेट व तत्सम साहित्य खरेदी करून जवळपास ३३ लाख ४० हजारांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोसायटी फॉर फास्ट जस्टीस विदर्भ नि या संस्थेने नागपूर विभागीय आयुक्त दे विजयलक्ष्मी बदरी यांच्याकडे दिलेल्या सूत्र तक्रारीतून केला आहे.

१५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला आलेल्या निधीचा त्यांच्या आराखड्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार ते खर्च करतात. याबाबतची निविदासुद्धा त्यांच्याकडूनच काढली जाते. यात पंचायत समिती किंवा गटविकास अधिकाऱ्यांचा काही सहभाग नसतो. त्यामुळे त्यांनी लावलेले आरोप हे खोटे व चुकीचे आहेत.

-संदीप गोडशेलवार, संवर्ग विकास अधिकारी, वरोरा

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे