नुकताच लागलेल्या दहावी बोर्डाच्या निकालामध्ये नेही विद्यालय मुलांची शाळेचा निकाल 94 % लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त करून विद्यालयाची परंपरा जपली. सध्याच्या परिस्थितीमध्ये पालकांचा ओढा हा कॉन्व्हेंट शिक्षणाकडे असून सुद्धा ने.ही. विद्यालयांमध्ये राज्यातील दूरवरून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. नेवजबाई हितकारिणी विद्यालयाचा इतिहास बघता या शाळेमधून शिकून अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केलेला आहे. व शाळेचा नाव विदर्भात घेतल्या जातो. जिथे यश तिथे कीर्ती या उक्तीप्रमाणे “कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा” अशाच प्रकारे या शाळेची कीर्ती ऐकून कोरपण्याचा नचिकेत कार याने ब्रह्मपुरीतील ने.ही विद्यालय मुलांची शाळाच निवडली कारण, या शाळेमध्ये एनसीसी कॅडेट कोर्स अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग दिल्या जाते. तसेच शाळेमध्ये अनुभवी शिक्षक, शाळेचा परिसर शाळेमध्ये होणारे उपक्रम, याबद्दल त्याला माहिती मिळताच त्याने ब्रह्मपुरीतील अनेक शाळांमधून एकच शाळा निवडली ती म्हणजे ने.ही.विद्यालय ब्रह्मपुरी मुलांची शाळा. कोरपना सारख्या दुर्गम भागातून शिक्षण घेण्यासाठी ब्रम्हपुरीला आला तेव्हा त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावा लागला. नचिकेत लहान असताना त्याचे पितृछत्र हरवले, आईने मजुरीचे काम करून दोघेही बहिण भावंडांना शिक्षण देण्याचे ठरविले. ब्रह्मपुरी ला येताच नचिकेतला राहण्यासाठी ठिकाण उपलब्ध नव्हता त्यामुळे त्याने आपल्या मामाचे गाव भालेश्र्वर येथून नऊ किलोमीटर सायकलने प्रवास करून आठवी नववीचे शिक्षण घेतले. त्यानंतर इयत्ता दहावी मध्ये त्याला शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले व राहण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृहाची सुविधा करून दिली. नचिकेत हुशार असल्यामुळे त्याने अनेक स्पर्धांमध्ये अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन शाळेत स्वतःची एक वेगळी छाप पाडली. विशेषतः नचिकेतची कुठलीही ट्युशन क्लास नव्हती. फक्त शिक्षकांचे मार्गदर्शन व स्वतःची मेहनत व जिद्दीच्या बळावर त्याने दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 93.40% मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला. खऱ्या अर्थाने हे यश कुतूहल करण्याजोगे आहे आणि एक आदर्श ठेवण्यासारखे सुद्धा आहे. कारण की आजच्या युगामध्ये पैसे देऊन ट्युशन क्लासेस, भरमसाठ फी देऊन कॉन्व्हेंट स्कूल कडे जाण्याचा ओढा विद्यार्थी व पालकांचा वाढलेला आहे पण नचिकेत कार सारखा मेहनती व जिद्दी विद्यार्थी असेल तर तो कुठेही यश प्राप्त शकते हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या या यशाचे कौतुक संपूर्ण शिक्षक संस्थेने सुद्धा केलेले आहे.त्याने आपल्या यशातून कृतीतून कठीण प्रसंगावर्ती मात करून सुद्धा उत्तम यश प्राप्त करता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे.
तुलेश्वरी बालपांडे ब्रह्मपुरी




