spot_img
Friday, June 19, 2026
HomeMaharashtraवडिलांच्या निधनानंतर बाळू धानोरकरांची प्रकृती खालावली, एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवणार

वडिलांच्या निधनानंतर बाळू धानोरकरांची प्रकृती खालावली, एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवणार

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवण्यात येणार आहे.

चंद्रपूर, : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने हलवले जाणार आहे. विशेष म्हणजे कालच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर आज सकाळी त्यांच्या मूळ गावी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती येथे अत्यसंस्कार करण्यात आले आहे.
काल संध्याकाळपासूनच बाळू धानोरकर यांना अस्वस्त वाटत होतं. त्यामुळे त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

आतड्यांमध्ये इन्फेक्शनची माहिती

मात्र प्रकृती बिघडल्यानं त्यांना आता विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे