spot_img
Tuesday, June 16, 2026
HomeMaharashtra२० वर्षांनंतर 'ते' पुन्हा आले एकत्र

२० वर्षांनंतर ‘ते’ पुन्हा आले एकत्र

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मुल १९९५ ते २००० बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

मुल/ तालुका प्रतिनिधी

शाळेत आणि मैदानावर ज्यांच्यासोबत आपण खेळलो ,बागडलो.मैत्री केली,भांडणे केली,मस्ती केली, धिंगाणा घातला, कधी शिक्षा तर कधी कौतुक पण अनुभवले, चेष्टा मस्करी ने संपूर्ण शाळा दणाणून सोडणारे वर्गमित्र तब्बल २० वर्षांनी भेटले.स्वामी विवेकानंद विद्या मंदीर मुल चा हायस्कूल च्या १९९५ च्या दहावी बॅच चा स्नेहमेळावा नुकताच उत्सहात पार पडला

मुल एम. आइ. डी. सी येथील कंपनीत संपन्न झाला. ज्या मित्र मैत्रिणीबरोबर सोबत खेळलो, बागडलो, मस्ती केली, भांडणे केली, एकत्र डबा खाल्ला त्यांना २० वर्षानंतर भेटत असल्यामुळे अनेकांना आपल्या बालमित्र मैत्रिणींना पाहण्याची त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती.

अनेक वर्षानंतर भेटत असल्यामुळे आपले मित्र मैत्रिणी आता आपल्याला ओळखतील का ? कसे दिसत असतील ? कोण काय काय करतंय ?असे अनेक प्रश्न मनात होते . या कार्यक्रमासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील तसेच बाहेरील वर्गमित्र मैत्रिणी आले होते. प्रत्येकाने एकमेकांची भेट घेऊन त्याच्या व्यवसायाबद्दल नोकरीबद्दल जाणून घेऊन चर्चा केली.

यावेळी वेगवेगळ्या कार्यां मधून विशेष कामगिरी करणार्‍या शिल्पा मंत्रिवार, आरती आरेवार, गोरव पराते , आरती उपाध्ये, दिप्ती मोहुर्ले, अभिषेक ढुमंणे,चंद्रकांत पावडे ,स्वाती कोंतमवार, फिरोज शेंडे,मनीष रक्षमवार हे सर्व एकत्र आले होते

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे