spot_img
Sunday, April 26, 2026
HomeMaharashtraभेजगाव ता.मुल येथील दारू भट्टीतुन चोरी गेलेला एकुन 54,000/रू चा मुददेमाल 36...

भेजगाव ता.मुल येथील दारू भट्टीतुन चोरी गेलेला एकुन 54,000/रू चा मुददेमाल 36 तासात हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची कामगीरी

खबर महाराष्ट्राची न्युज

दि 16/04/2023 व 17/04/2023 रोजीचे रात्रो दरम्यान भेजगाव ता. मुल येथे आखिल गांगरेड्डीवार यांचे मालकीचे दारू भट्टीतुन 21 पेटी बियर कॅन चे बॉक्स, 1 पेटी देशी दारूची पेटी, तसेच काउंटरमध्ये ठेवलेले नगदी 2700 रू व देवघरातील नगदी 1500 रू असा एकुण 84,395/- रू चा मुद्देमाल चोरी झाल्याने पोस्टे मुल अप.क्र. 147/ 23 कलम 461,380 भादंवी चा गुन्हा नोंद करण्यात आला. येथे

सदर गुन्हयाचा स्था गु शा चंद्रपुर हे समांतर तपास करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, चंद्रपुर शहर बंगाली कॅम्प परीसरात राजीव गांधी नगर चंद्रपुर येथे राहणारे राकेश महतो याचे घरी चोरीची दारू लपवुन ठेवली आहे अशा माहीती वरून राकेश महतो रा. राजीव गांधी नगर चंद्रपुर याचे घरी पंचासमक्ष गेलो असता राकेश महतो हा पोलीसांना पाहुन मोटरसायकलने पळुन गेला. नमुद ईसमाचे पत्नी पुजा महतो व पंचासमक्ष झडती घेतली असता बाथरूम मध्ये लपवुन ठेवलेला चोरीचा मुद्देमाल बियरचे 18 बॉक्स एकुण 54,000 रू चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. तसेच सदर दारू ही राकेश महतो, विनोद उर्फ विककी महतो व ईतर एक अनोळखी इसमाने आणुन ठेवल्याचे पुजा महतो सांगीतले.

पोस्टे मुल अप. क. 147/ 23 कलम 461,380 भादवीचा गुन्हा नमुद आरोपीकडुन उघडकीस करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, पो.हवा. नितीन साळवे, पो. हवा. प्रकाश बलकी व पो.अ. मिलींद जांभुळे, सतिश बगमारे, मपोअं अपर्णा मानकर व चानापोका दिनेश अराडे यांनी केली.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे