spot_img
Saturday, April 25, 2026
HomeMaharashtraस्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची IPL क्रिकेट सट्टेबाजांवर धडक कार्यवाही

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची IPL क्रिकेट सट्टेबाजांवर धडक कार्यवाही

खबर महाराष्ट्राची न्युज

सुद्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट वर मोठया प्रमाणात सटटा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करन्याचे अनुसंघाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी / कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन कार्यवाही करत.

शिवाजी नगर राधाकुण शाळेचे मागे तुकुम चंद्रपुर येथे राहणारा देविदास पडगीलवार हा इंडियन प्रिमीयर लीग २०२३ (IPL 2023) के. के. आर. विरूध्द आर.सि.बि या क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम लाईव्ह मॅचवर टीव्ही, मोबाईलवर IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन मोबाईल, टीव्ही, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण ३०,०१० /- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन सटटेबाज नामे १) देविदास दिलीप पडगीलवार वय ३२ वर्ष रा. दे. गो. तुकुम शिवाजी नगर राधाकृष्ण शाळेचे मागे चंद्रपुर २ ) पाहिजे आरोपी नामे अविनाश हांडे वय ३७ वर्ष रा. ताडबन वार्ड चंद्रपुरयांचे विरूदध पो स्टे रामनगर येथे अप.क्र. ३४८ / २०२३ कलम ४, ५ मु.जु.का., सहकलम १०९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.उप.नि. अतुल कावळे, पो. हवा. संजय आतकुलवार, नापोकॉ संतोष येलपुलवार, पोकों नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, कुंदन बावरी, रविंद्र पंधरे यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे