spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraराज्य शासनाचा मोठा निर्णय! राज्यात वाळूचे लिलाव बंद; आता 8 हजाराची वाळू...

राज्य शासनाचा मोठा निर्णय! राज्यात वाळूचे लिलाव बंद; आता 8 हजाराची वाळू मिळणार मात्र ‘इतक्या’ रुपयात घरपोच, महसूलमंत्री पाटील यांची माहिती

खबर महाराष्ट्राची न्युज : राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील जनतेला घर बांधणे अधिक स्वस्त होणार आहे. सोमवारी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्यातील वाळूचे लिलाव बंद होणार आहेत. सर्व जिल्ह्यात लिलाव बंद करून आता वाळूची नवीन डेपो योजना सुरू केली जाणार आहे.

याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी माहिती दिली आहे. विधानसभेत मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाकडून आता राज्यातील वाळूचे लिलाव बंद होणार आहेत. यामुळे वाळूचा सुरू असणारा काळाबाजार आणि माफीया राज संपुष्टात येईल असा दावा शासनाचा आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे सध्या काळ्या बाजारात जी वाळू आठ हजार रुपये ब्रास या दराने मिळते ती वाळू मात्र 650 रुपये ब्रास या दराने मिळू शकते असा दावा होत आहे. यामुळे वाळूमाफियांची गुंडगिरी संपुष्टात येईल आणि राज्यातील माफिया राज मिटेल असा दावाही विखे पाटील यांनी विधानसभेत केला आहे. आता नवीन डेपो योजनेअंतर्गत राज्यातील जनतेला वाढू मिळणार असून यासाठी या डेपोचे काम राज्य शासनाकडून हाती घेण्यात येणार आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे