spot_img
Tuesday, June 9, 2026
HomeMaharashtraचंदिगडमध्ये राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या पुतण्याचा संशयास्पद मृत्यू

चंदिगडमध्ये राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या पुतण्याचा संशयास्पद मृत्यू

खबर महाराष्ट्राची न्युज

चंद्रपूर :-. माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या पुतण्याचा मृतदेह चंदीगडमध्ये संशयास्पदरीत्या सापडला आहे. चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या पुतण्याचा व त्याच्या मित्राचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
हंसराज अहीर यांचा पुतण्या महेश हरिश्चंद्र अहीर आणि चंद्रपूर येथील रहिवासी असलेला त्यांचा मित्र हरीश धोटे आठ ते दहा दिवसांपूर्वी चंदीगडला गेले होते. दरम्यान, दोघांचेही नातेवाईक आठवडाभरापासून दोघांशी सम्पर्क करू शकत नव्हते, त्यांचे मोबाईल बंद येत होते. त्यामुळे दोघांचे नातेवाईक चांगलेच चिंतेत होते.15 मार्च रोजी दोघांच्याही नातेवाईकांनी चंद्रपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनीही या दोघांचा शोध घेण्यासाठी एक पथक चंदीगडला रवाना केले होते.दरम्यान, बुधवार, 22 मार्च रोजी चंदीगडच्या सेक्टर 36 पोलीस ठाण्यांतर्गत एका ठिकाणी पोलिसांना दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती सायंकाळी चंद्रपूर येथे पोहोचल्याने येथे एकच खळबळ उडाली. चंदीगडला दोघांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली…? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
अधिक तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे