खबर महाराष्ट्राची न्युज ( अहेरी )
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी व दुर्गम भागातील अहेरी आगारातील बस भंगार स्थित असताना सुद्धा रस्त्यावर धावत आहेत.यामुळे विद्यार्थी व प्रवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आगार प्रमुखाकडून सर्रास केला जात आहे. ‘बसचा प्रवास हा सुखाचा प्रवास’ म्हटलं जात.मात्र अहेरी आगारातील बसचा प्रवास धोक्याचा अहेरी आगारात जवळपास 15 ते 20 बस प्रवाश्याच्या सोयीसाठी आहे.मात्र यातील बहुतांश बस हे फिटनेस कालबाह्य झाल्या असून यातील अनेक बसचा इन्शुरन्स संपले अल्लापल्ली सिरोंचा आगारातून आष्टी, या तीन बस स्थानकाच्या परिसरातील विद्यार्थी व नागरिकांच्या प्रवासाकरिता रस्त्यावर फेऱ्या मारताना दिसत तसेच अहेरी आगारातून बसेस चा नेहमीच तुडवडा असल्याने नोकर वर्ग प्रवासी व विध्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे शासनानी 10 वर्षा. अगोदर मानव विकास अंतर्गत 45 बसेस दिल्या परंतु. त्या खिळ खिळ्या नादुरुस्त झल्या त्यामुळं फेल होण्याचे प्रमाण वाढले. आहे. करिता शासनाने पुन्हा मानव विकास अंतर्गत नवीन बसेस द्याव्यात.
जेणे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक. नुकसान होणार नाही आणि. शाळेत. वेळेवर. जाता येइलआताच. शासनाने. पाऊल उचलले. तर. येणाऱ्या शैक्षणिक. सत्रात विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही.
काळी पिवळी वाहन चालकांची मनमानी
याच संधी चा फायदा खाजगी वाहतुकदार घेत असून ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे अल्लापल्ली तॆ सिरोंचा मार्गावरुन धावणाऱ्या काळी पिवळी वाहन चे चालक ग्राहका कडून प्रत्येकी 300 रुपये प्रती टिकीट आकारुन ग्राहकांची लूट करत आहे या कडे प्रशासन ने ल़क्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे




